spot_img
spot_img

दुचाकीवरून मंगळसूत्र चोरले.. मग त्यांना एलसीबीने घेरले! – बजाज पल्सर जप्त,2 गुन्ह्यांची उकल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एलसीबीच्या धडाकेबाज कारवाया सुरु असून, पथकाने वरणगावातून 2 चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मलकापूर व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील 2 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.1,00,000 रुपये किमतीची बजाज पल्सर आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.

अब्बास इबादात शेख अली (23) रा. भूसावळ ह. मु. वरणगाव जि. जळगाव, साहिल हुसैन मोहम्मद इज्जत अली जाफरी (21) रा. बिदर, कर्नाटक असे आरोपीचे नावे आहेत. घटनेची हकीकत अशी की, निकीता गोरे रा. श्रीराम कॉलनी, मलकापूर ह्या नातेवाईकांसह गणपती दर्शन घेऊन घराकडे जात असतांना अनंतकृपा फर्निचर गोडावून समोर आरोपींनी मागून दूचाकीवर येऊन गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची 12,6000 रुपये किमतीची पोथ जबरीने हिसकावून पोबारा केला होता. याबाबत मलकापूर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवून दोन्ही आरोपींना गजाआड करून मलकापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये,हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे,शेख चांद, गणेश पाटील, गजानन गोरले,आशा मोरे, निवृत्ती पुंड, शिवानंद हेलगे, राजू आडवे, कैलास टोंबरे यांनी केली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!