बुलढाणा (हॅलो बुलढाणा) “मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशी प्रेस नोट काढणारे शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर! त्यांनी कशासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना बोलावलंय? मात्र कशासाठी? हे समजण्या इतपत आपण दूधखुळे नाहीतच! कारण आगामी विधानसभा जवळ येऊन ठेपली आहे.
लोकसभेत अडीच लाख मते घेऊनही पराभूत झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर शनिवारी 6 जुलै रोजी आपली पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्धार दिसतोय.यासाठी जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बुलढाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या गोलांडे लॉन्स येथे ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच बैठक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर रविकांत तुपकर आपल्या कार्यकर्त्यांशी प्रथमच जाहीरपणे संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे शिवाय या बैठकीत रविकांत तुपकर कोणती राजकीय भूमिका जाहीर करतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.