बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पत्नीने पोटातील बाळ पाडल्याची वार्ता कानी पडल्याने बाहेरगावावरून पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पती व सासरच्या मंडळीत वाद होऊन पतीने विषारी औषध प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याची घटना मोताळा तालुक्यातील ग्राम लपाली येथे 8 सप्टेंबरला समोर आली आहे.
बादल हवसु मंडाळे, रा. कुंभारी ता. जामनेर जि. जळगाव असे मृतकाचे नाव आहे.याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी आरोपी रूपाली बादल मंडाळे,संजय जयराम भवर,लिलाबाई संजय भवर,अक्षय संजय भवर सर्व रा. लपाली ता. मोताळा, जि.बुलढाणा या आरोपी विरुद्ध कलम 108,3(5) भा.न्या.स 2023 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
इंदुबाई मुके रा. कुंभारी यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली. मृतक बादल याची पत्नी रुपालीने पोटातील बाळ पाडले अशी माहिती इंदूबाईचा भाचा यांच्याकडून माहिती मिळाली होती.ही माहिती मिळताच बादल यांनी लपाली गावी जाऊन पत्नी रुपालीला घेऊन येतो सांगून जामनेर येथून लपाली येथे आला होता.त्यानंतर फिर्यादी इंदुबाईंचा पुतण्या श्रीराम जोशी याला फोनवरून माहिती पडले की,बादल मंडळे हा विषारी औषध घेऊन मृत्यू पावला आहे. गावात या प्रकरणी विचारपूस केली असता, लपाली येथील गोपाल दगडू मंडाळे यांनी बादल व त्यांची पत्नी, सासू- सासरे यांच्यात वाद झाल्याचे सांगितले. या त्रासाला कंटाळून बादल यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.