बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात धामणगाव बढे येथील गरजवतांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा अद्याप लाभ मिळाला नाही.गरजूंना दोन ते तीन दिवसात घरकुलाचा लाभ मिळवून न दिल्या डफडे बजाव आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य शेख आलीम कुरेशी व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे आज 8 सप्टेंबरला दिला आहे.
सरकार नागरिकांसाठी अनेक निरनिराळ्या योजना राबवत असते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील करोडो लोकांना मिळत असतो. सरकार लोकांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार योजना आणते. स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र असे असूनही अनेकांना, त्यांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्ने पूर्ण करता येत नाही. आजही अनेक लोक कच्च्या घरात राहतात. सरकार अशा लोकांना त्यांचे कर निश्चित करण्यात मदत करते. याच धर्तीवर सरकारने सन २०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार गरजूंना कायमस्वरूपी पक्की घरे मिळवून देण्यासाठी मदत करते. परंतू मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील गरजवतांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा अद्याप लाभ मिळाला नाही. शासकीय जमिनी नियमानुकुल करून घरकुलांचा लाभ द्यावा, या मागणीची प्रशासकीय यंत्रणा दखल घेत नाही. जिल्ह्यातील इतर ठिकाणी लाभ देण्यात आला मात्र धामणगाव बढे येथील अनेक लाभार्थी घरकूलाच्या लाभापासून वंचित आहेत. दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ द्यावा, अन्यथा गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात डफडे बजाव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेख आलीम कुरेशी, जमीर कुरेशी, रविराज महाजन यांनी दिला आहे.