बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्याच्या साखळी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील ४थी मध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनुने हिने केवळ नवव्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील खडतर असा साडेतीनशे फूट खोल असलेला शितकडा रॅपलिंग करून विक्रम केला आहे. तर यापूर्वी १८०० फूट खोल कोकणकड्यावरून रॅपलिंग करत विक्रम केला होता, तिच्या धाडसी कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने देखील दखल घेतली आहे. तिच्या या धाडसाबद्दल हिमॉर्डिल ट्रेक अॅडव्हेंचर संस्थेने ‘सह्याद्रीची हिरकणी’ ही उपाधी बहाल केली आहे. सिद्धीने या आधीही २६ जानेवारी २०२५ रोजी हिमालयातील १२,५०० फूट उंचीचा केदारकंठा कडा सर केला असून, तिथेही तिने तिरंगा फडकावला होता, सिद्धीच्या या धाडसी कामगिरी बद्दल तिच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.