spot_img
spot_img

आधी तिने धुमाकूळ घातला.. शेतकऱ्यांना भयभीत केले..मग वन विभागाने तिला पिल्लासह रेस्क्यू केले!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एका महिन्या पासून शेतशिवारात आपल्या एका पिलासह वावरणाऱ्या अस्वलामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.या अस्वल व तिच्या पिल्लाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार गावकऱ्यांकडून होत असल्याने बुलढाणा वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने दहिगाव परिसरात मादी अस्वल व तिच्या पिल्लाला रेस्क्यू करून आंबाबरवा अभयारण्यात सुखरूप सोडल्याची माहिती बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी 8 सप्टेंबर रोजी दिली आहे.

बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या दहीगांव, करणखेड,मातमखेड परिसरात मागील एका महिन्यापासून एक मादी अस्वल आपल्या पिलासह शेतशिवारात फिरत असल्याने शेतकरी व शेत मजुरांमध्ये भीतीचे वातावरण होते.ते शेतात जाण्यासाठी घाबरत होते. त्यामुळे सदर गावांच्या सरपंचांनी बुलढाणा वनविभागाला माहिती देऊन या अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांनी अस्वलाला रेस्क्यू करण्याचे आदेश दिले असता एसीएफ वैभव काकडे आणि बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी रेस्क्यू पथकातील सदस्य शुटर संदीप मडावी,अमोल चव्हाण,पवन वाघ,पवन मुळे,प्रमोद गव‌ई,राणी जोगदंड आणि प्रमोद सावळे यांना दहीगांव परिसरात 6 सप्टेंबर रोजी रवाना केले. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सदर अस्वल पिल्लासह आंब्याच्या झाडावर चढल्याचे दिसून आले. मादी अस्वलाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले तर तिच्या पिल्लाला फिजिकल रेस्क्यू करण्यात आले. मादी अस्वल झाडावरच बेशुद्ध झाल्याने तिला दोरी बांधून खाली उतरवण्यात आले. मादी अस्वल व पिल्लाला पिंजऱ्यात टाकून बुलढाणा येथील राणी बागेत आणण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काल 7 सप्टेंबर रोजी या दोन्ही अस्वलांना बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!