चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली तालुक्यातील मौजे पांढरदेव येथील सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के (27 वर्ष) यांनी दि. 04/09/2025 रोजी सकाळी 8 वाजता पांढरदेव येथील तेजराव खेडेकर यांना काठीने मारहाण केल्याने अपराध न. 0293/2025 ने कलम 2023 115(2),118(1),333,351(2),351(3),189(1),189(2),191(2),191(3)190 . कलमाद्वारे अमडापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याबद्दल तेजराव खेडेकर यांनी दिलेल्या अमडापूर पोलीस स्टेशन रिपोर्टवरून तेजराव खेडेकर यांच्या घरासमोरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता गेल्या तीन वर्षापासून का खोदला याची विचारणा तेजराव खेडेकर यांनी 04/09/2025 रोजी केली असता सरपंच चेतन म्हस्के यांची आई संगीता रामकृष्ण म्हस्के यांच्यासह सरपंच चेतन म्हस्के व इतर नऊ जणांनी काठीने तेजराव खेडेकर यांच्या डोक्यावर मारहाण करीत असताना हाताने अटकाव करताना त्यांच्या हातावर मारहाण केली. त्यानंतर तेजराव खेडेकर यांनी वेळीच पोलीस स्टेशन गाठून पत्नीसह रिपोर्ट दिला. त्यावरून वरील प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास पो. कॉ. टेकाळे ठाणेदार निर्मळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
- Hellobuldana