spot_img
spot_img

मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्षपदी गणेश सोळंकी प्रदेश प्रतिनिधीपदी मयूर निकम

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार गणेश सोळंकी तर, प्रदेश प्रतिनिधी म्हणून झी 24 तास चे प्रतिनिधी मयूर निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ आणि पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ८, सप्टेंबर रोजी ही निवड करण्यात आली आहे.

पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा विस्तार राज्यभर होत आहे. बुलढाण्यातही पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ‘पत्रकारांचा आवाज’ म्हणून ही संघटना नावारूपास आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे प्रमुख अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर, अमरावती विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या नेतृत्वात उपरोक्त नियुक्त्या घोषित करण्यात आल्या. नियुक्ती झालेल्या मान्यवरांचा गौरव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सिंग राजपूत, प्रदेश प्रतिनिधी नितीन शिरसाट, चिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसीम शेख, प्रेमकुमार राठोड, सचिव शिवाजी मामनकर, डिजिटल मीडिया परिषदेचे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ, जिल्हा सरचिटणीस दीपक मोरे, अभिषेक वरपे उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!