बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपालिकेसह जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करत, कंत्राटदाराकडून सफाई कामगारांना सहा ते सात हजार रुपये मानधन दिले जात आहे, मात्र 18 हजार रुपये मानधनावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या सर्व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी बुलढाणा ते मंत्रालय मुंबई हे कर्मचारी पायी रवाना झाले आहेत.
चार पाच दिवसाचा प्रवास करून मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणाऱ्या आहेत. मुंबई रवाना होण्यापूर्वी या सफाई कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यांच्या या मागण्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.