बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर शासनाने आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे, ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी आणि हा जीआर रद्द करावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
शासनाने हा जीआर रद्द न केल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तोडीस तोड आंदोलन उभारून, रस्त्यावरची लढाई लढली जाईल.. असा इशारा यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदेचे संतोष खांडेभराड, वसंतराव मगर, मधुसूदन सपकाळ, समाधान गुऱ्हाळकर, नामदेवराव बीजावर,राजेंद्र तायडे, एकनाथ सोनने,दिलीप इंगळे,पुरुषोत्तम दाते,संदीप पांडव आदी विविध पदाधिकाऱ्यांसह ओबीसी समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.