मेहकर (हॅलो बुलडाणा) मेहकर शहरातील लोकप्रिय, संघर्षशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवसेना शहर प्रमुख मा. किशोर गारोळे यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. सामाजिक बांधिलकी आणि जनतेसाठी झटणारा लढवय्या नेता अशी त्यांची ओळख असून, गोरगरिबांसाठी तत्पर राहणे, तरुणांना दिशा देणे आणि शहर विकासाच्या कामांमध्ये पुढाकार घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी वेगळ्या पद्धतीने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “हा दावा व्यर्थ ना व्यर्थ ही बढाई, किशोरभाऊ जिंकणार उद्याची लढाई!” या घोषणांनी सोशल मीडियावर गारोळेंच्या नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेला जोरदार उधाण आले आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गारोळे यांचे नाव प्रमुख दावेदार म्हणून घेतले जात आहे.समाजकारणासोबतच त्यांनी केलेली मदत, नाते जपण्याची सहजता आणि नेतृत्वगुण यामुळे त्यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. “कामाला लागा” ही त्यांची ओळखच त्यांच्या कार्यशैलीचे प्रतीक ठरत असून, आज वाढदिवसानिमित्त मेहकरवासीयांसह तालुक्यातील जनतेतून त्यांना भरभरून शुभेच्छा मिळत आहेत.
टीम ‘हॅलो बुलढाणा’ तर्फे किशोर गारोळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!