बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील पत्रकारांनी पहिल्यांदाच वृत्तेश्वर गणेश मंडळाची स्थापना करून पत्रकार भवन परिसरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. जिल्हा पत्रकार संघाच्या संकल्पनेतून पार पडलेल्या गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम तथा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, गत दहा दिवसांत भजन स्पर्धा, निंबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच काव्य मैफिलीच्या प्रस्तुतीतून कलाकारांनी श्री गणराया चरणी अभिवादन केले. शनिवारी वृत्तेश्वर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पत्रकार बांधवांनी काढलेल्या विसर्जन मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. बुलढाण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान देणार्या पत्रकारांनी पहिल्यांदाच सामूहिक गणेशोत्सव साजरा केला. दरम्यान, गत दहा दिवसांत विविध प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच लोकाभिमुख मान्यवरांच्या हस्ते वृत्तेश्वर गणरायाची आरती झाली. सर्वच मान्यवरांनी जिल्हा पत्रकार संघाच्या गणेश मंडळाचे व त्यांच्या आयोजनाचे भरभरून कौतुक केले. हा गणेशोत्सव खर्या अर्थाने वैचारिक व सामाजिक एकात्मिकतेचा संदेश देणारा ठरला, अशी भावना अनेकांनी3 व्यक्त केली. विशेष म्हणजे, वेदांमध्ये श्री गणेशाची 108 नावे आहेत. मात्र, पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी भवृत्तांचा ईश्वर अशा संकल्पनेतून पत्रकारांच्या गणेश मंडळाला वृत्तेश्वर’ असे नाव दिल्याने या नावाची चर्चा सर्वदूर झाली. यावेळी पत्रकार सर्वश्री चंद्रकांत बर्दे, राजेश डीडोळकर, नितीन शिरसाट, भानुदास लकडे, सुधाकर आहेर, प्रा.सुभाष लहाने, प्रेमकुमार राठोड, गणेश निकम, जितेंद्र कायस्थ, शिवाजी मामलकर, विजय देशमुख, रविंद्र गणेशे, बाबासाहेब जाधव, ब्रम्हानंद जाधव, डॉ.भागवत वसे, किशोर खंडारे, दिपक मोरे, सुरेखाताई सावळे, राम हिंगे, सुधाकर मानवतकर, मृणालताई सावळे, अजय राजगुरे, तुषार यंगड, अजय काकडे, आकाश भालेराव, अभिषेक वरपे, मोहम्मद फरजान यांच्यासह भुषण पंजाबी, अॅड.रमेश भागीले, गणेश नरोटे, सुभाष देशमुख, सिध्दी डीडोळकर यांची उपस्थिती होती.
▪️विसर्जन मिरवणुकीने वेधले लक्ष्य!
वृत्तेश्वर मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधल्याचे दिसून आले. ट्रॅकटरवर सजावट करून वृत्तेश्वर गणरायाची मूर्ती बसविण्यात आली होती. पत्रकार भवन परिसरातून निघालेली मिरवणूक संगमचौक मार्गे श्री शिवाजी विद्यालयाजवळील सुवर्ण गणेश मंदिरा समोर पोहोचली. मंदिरातील गणेश मूर्तीला पुष्पांजली अर्पण करीत मिरवणूक पुन्हा संगम चौक मार्गे सागवन येथील नदीच्या दिशेने निघाली. दरम्यान, ढोल – ताशांच्या ठेक्यावर सर्वच पत्रकार मनमुराद थिरकले. नदीकाठी पोहोचल्यावर गणेशाच्या मूर्तीचे भावपूर्णवातावरणात विसर्जन करण्यात आले.