spot_img
spot_img

💥BREAKING जमिनीवर अतिक्रमण? बुलढाण्यात शेतकरी थेट टॉवरच्या शिखरावर!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात आज पुन्हा एकदा थरारक घटना घडली. कोर्ट चौकातील बीएसएनएलच्या उंच टॉवरवर येळगाव येथील शेतकरी राजू भीमराव काकडे (वय 40, जात कुणबी मराठा) हा चढल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दुपारी 3 नंतर ही घटना घडताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली.

राजू काकडे याची 2 एकर शेती येळगाव धरणाच्या भिंतीखालील बुडीत क्षेत्रात आहे. याच जागेवर बुलढाणा नगरपालिकेकडून सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्याच्या शेतीवर कुठलीही पूर्वसूचना न देता काम सुरू केल्याने संतप्त झालेल्या काकडे यांनी थेट टॉवरवर चढून प्रशासनाला धक्का दिला आहे.टॉवरच्या शिखरावर बसलेला काकडे याच्याकडे साधा मोबाईल असून तो बंद केलेला आहे. त्याने टॉवरवर चढल्याची माहिती स्वतःच फोनवरून गावकऱ्यांना दिली होती. त्याचा भाऊ गोपाल भीमराव काकडे हा घटनास्थळी पोहोचला असून त्याने संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे.

या प्रसंगामुळे कोर्ट चौकातील वाहतूक विस्कळीत झाली असून बीएसएनएल टॉवरखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राठोड साहेब आणि त्यांचा ताफा सतत लक्ष ठेवून आहे. परिस्थिती तणावपूर्ण असून काकडे खाली उतरणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीचे सौंदर्यीकरण काम प्रशासनाने थांबवावे, अन्यथा आत्मत्यागाची वेळ येईल, असा इशारा काकडेने अप्रत्यक्षपणे दिला आहे. बुलढाणा शहरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!