बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सावळा सुंदरगड येथे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. परंतु समस्यांच्या सोडवणुकीसाठी सरपंचा निष्क्रिय दिसून येत असल्याने ते नागरिकांचा रोष ओढावून घेत आहेत.
यासंदर्भात नागरिकांनी निवेदन दिले असून, ते म्हणाले की,
संपूर्ण मागासवर्गीय वस्ती असलेल्या नाले सफाईकडे सावळा सुंदरखेड सरपंच, ग्रामसेवक यांचे
जाणून बुजून दुर्लक्ष व सांडपाणी वाहून जाणारी सिमेंटची पक्की नाली फोडून थातूर
मातूर २ ते २.५ फुट खोदलेल्या शौषखड्डयाची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी. उन्हाळ्यापासून कालपर्यंत तोंडी अर्ज, विनंती, भेट व चर्चा करण्यात आल्यावरही समस्या सुटली नाही.
त्यामुळे नागरिकांनी विविध समस्या संबंधित अधिकाऱ्यांना मांडल्या आहेत. त्यांनी निवेदनात म्हटले की,सुंदरखेड ग्रामपंचायत अंतर्गत विजयनगर रहिवाशी सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीच्या १० फुट सर्विस लाईनच्या पूर्व-पश्चिमेला १०-१० घरे आहेत. सांडपाणी वाहू जाण्यासाठी ३-४ वर्षांपूर्वी बांधलेली सिमेंटची पक्की नाली फोडून, तोडून २ ते २.५
फुट खोल शोषखड्डे खोदले. शोषखड्डे किमान ५ ते ६ फुट खोल व त्यात विटांचे तुकडे, रेती, कोळसा व वरून फरशीचा ढापा आवश्यक असतांना ठेकेदार, ग्रामसेवक व सरपंच (पती) कोणाचेही न ऐकता थातूरमातूर २ ते २.५ फुट खड्डे खोदून त्यातील मातीचे नालीत आडवे बांध टाकून पावसाचे पाणी
वाहून जाणार नाही असे गैरकाम केले आहे.त्यामुळे अनेक ठिकाणचे बाथरूमचे पाईप शोषखड्डयात नसल्याने घाणपाणी तुंबून दुर्गंधी येत आहे.
काहींच्या संडासचे पाईप ब्लॉक झाले आहेत.विशेष म्हणजे नालीच्या शेवटी एका व्यक्तीसाठी ७ फुट खोल शोषखड्डा तयार करून त्यावर फरशीचा धापा टाकून चोहीकडून विटांचे बांधकाम करून दिले. त्या शोषखड्डयात इतर कोणाचेही सांडपाणी येणार नाही व पावसाचे पाणी सुध्दा वाहून जाणार नाही. (ते पाणी नालीतच थांबले पाहिजे.)
म्हणून माती, खडकाचा आडवा बांध टाकलेला आहे. सरपंच पती म्हणतो, “तुम्हाला जिथे तक्रार करायची आहे तिथे खुशाल करा” तुमच्या मागास वस्तीचे
मला घेणे-देणे नाही.असाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदरील बाब बि.डी.ओ.पवार मॅडम यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून मातीचे आडवे बांध काढून टाकण्याच्या सरपंच, ग्रामसेवक व संबंधितास सुचना देऊन ३ महिन्यांचा कालावधी झाला. पण सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वरिष्ठांच्या सुचनांचे अजिबात पालन करीत नाही. त्यामुळे
मागासवर्गीयांचे कोण ऐकणार? असा सवाल विचारला जात आहे.
विविध समस्यांच्या तक्रारी त्या परिसरातील नागरिकांनी हॅलो बुलडाणाकडे सुपूर्त केल्या आहे