मेहकर (हॅलो बुलढाणा) पोलीस समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहेत.महिलां सोबत तर त्यांची सौजन्यपूर्वक वागणूक असायला हवी, मात्र मेहकर पोलीस ठाण्यातील पीआय आलेवार यांनी पारडा येथील महिला सरपंचांना अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे खरंच पोलीस सौजन्याची वागणूक देतात का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेहकर तालुक्यातील पारडा येथील सरपंचा रुक्मिना झनकलाल
बच्छिरे यांनी तक्रार दिली आहे की,पारडा, शिवपुरी, बदनापूर,चौंध व कळपविहीर या 5 गावातील मुले मेहकर येथील शाळेत आहेत. दरम्यान मेहकर कडे जाणाऱ्या रस्त्यात एक ट्रेलर 30 ऑगस्टला उलटून आडवे झालेले असल्यामुळे वाहतूक बंद झाली. सरपंचा व त्यांचे पती मेहकर पोलीस ठाण्यात सदर बाब सांगण्यासाठी गेल्यावर पीआय आलेवार यांनी त्यांना असभ्य वागणूक देऊन अश्लील शिवीगाळ केल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. पीआय आलेवार हे उद्धट कर्मचारी असून महिलांचा सन्मान राखत नाही,मी सरपंच असूनही, ‘तुला कुठे जायचे ते जा’ असे ते म्हणाले असून त्यांनी याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.