spot_img
spot_img

‘ही समिंदराची लाटं देवा,पाहते तुमची वाटं..!’ – उद्या बुलढाण्यातील ‘बाप्पा’ तराफ्यावरुन नदीत उतरणार! – 1385 सार्वजनिक गणेश मंडळांची झाली होती प्रतिष्ठापना!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) ढोलताशांचा दणादणाट… फटाक्यांची आतषबाजी…फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’ च्या जयघोषात व भारावलेल्या वातावरणात बाप्पांच्या मिरवणूकीने उद्या बुलढाणेकरांचे लक्ष वेधले जाणार आहे.जिल्ह्यातील1385 सार्वजनिक गणेश मंडळ निश्चित करण्यात आलेल्या विसर्जन स्थळी बापांना भावपूर्ण निरोप देणार आहेत.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’अशा जयघोषात लाडक्या गणेशाचे बुलढाणा शहरातील सागवन येथील नदीच्या पूलावरून मोठे मंडळ उद्या 6 सप्टेंबरला विसर्जन करतील. बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी शहरी आणि ग्रामीण भागात एकूण 1385 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये शहरी भागात 470 ग्रामीण भागात 925 गणेश मंडळ स्थापन करण्यात आले.यापैकी 307 गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही मोहिम राबविण्यात आली.गेले 9 दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे उद्या दहाव्या दिवशी पाणावणार आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला जाईल. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसोबतच प्रशासकीय यंत्रणांनीही कंबर कसली आहे.

▪️शहरातील बप्पा येथे होणार विसर्जित!

नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे.सागवन येथील नदीवरील पुलावर मोठ्या मंडळाच्या गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.टीबी हॉस्पिटल जवळील सरकारी तलाव आणि राणी बागेतील तलावाचे बांधकाम सुरू असल्याने आणि यामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने येथे गणेश विसर्जन करता येणार नाही. तसेच मलकापूर रोडवरील तलावाजवळ बॅरिकेटिंग करून हा तलाव विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे. घरगुती व लहान गणेश विसर्जनासाठी विविध स्थळ निश्चित करण्यात आले असून कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे.टीबी हॉस्पिटल जवळील सरकारी तलाव समोर, गजानन महाराज चौकातील राधिका हॉटेल समोर,गणेश नगर पाटील जवळ, एकता नगर नाट्यगृहासमोर आणि राणी बागेत कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!