बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील कारंजा चौक स्थित दुर्गा माता मंदिरातील दानपेटी चोरणारे दोन युवक स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. आरोपींनी दानपेटीतून 19 हजार रुपये काढून घेऊन भोंडे सरकार चौकात रिकामी दानपेटी टाकून दिली होती. त्यापैकी केवळ पाच हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.अक्षय दिगंबर गवारगुरु (28),मनोहर कैलास पवार(30) दोघे रा.बुलढाणा अशी आरोपींची नावे आहेत.
गजबजलेल्या कारंजा चौकात 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री दुर्गामाता मंदिरातील दानपेटी चोरल्याची खळबळजनक घटना घडली होती.दरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज मध्ये एक आरोपी पोलिसांना आढळून आला होता.त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासचक्र फिरवून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.दानपेटीत गणेशोत्सव व गौराईच्या सणानिमित्त तगडी रक्कम असल्याने या चोरट्यांनी डल्ला मारला होता.14 हजार रुपये उडवून आता ते जेलाची हवा खाणार आहेत.