बुलडाणा (हॅलो बुलढाणा) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुलडाणा अर्बन परिवाराकडून बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे वतीने यावर्षीही गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे थाटात आयोजन करण्यात आले. दरम्यान मंडळाच्या कर्मचाऱ्यांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला आहे.
गणेश मंडळाचे २४ वे वर्ष असून यावर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेश उत्सवानिमित्त संस्थेने गणेश उत्सव मंडळाचे प्रमुख
मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेश झंवर, अनंतभाऊ देशपांडे संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सप्टेंबर रोजी संस्थेच्या गोवर्धन इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंग मध्ये कर्मचाऱ्यांसाठी वृक्षारोपणाचा संकल्प राबविला. कर्मचाऱ्यांना आंबा या वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आंबा वृक्षांचे वृक्षमित्र म्हणून त्याचे वर्षभर संगोपन करण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.














