spot_img
spot_img

कंत्राटी,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सीटूचे समर्थन! – सेवेत कायम स्वरुपी समायोजन करण्याची मागणी!

बुलडाणा (हॅलो बुलढाणा) राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम स्वरुपी समायोजन करण्यात यावे या मागणीसाठी 19 ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनाला सिटीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

गेल्या १५ दिवसापासून सेवेत कायम स्वरुपी समायोजन करण्यात यावे,या प्रमुख मागणीला घेऊन जिल्ह्यातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी हे आंदोलन करत आहेत.त्यांच्या या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घेऊन त्यांना सेवेत कायम करावे, यासाठी आज सीटूच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन दिले.सदर निवेदन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.सरकारने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा सीटू या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात जिल्ह्यात सर्व शक्तीनिशी सहभागी होईल असा इशारा यावेळी गायकवाड यांनी पाठिंबा देताना सरकारला दिला.यावेळी निवेदन देताना संघरत्न साळवे, मनिषा बोराडे,मेघा पारस्कर, दत्तात्रय गायकवाड,गौरव वानखेडे,स्वाती गावंडे इत्यादी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!