spot_img
spot_img

काय सांगता? बुलढाणा जिल्ह्यात फक्त 27 टक्केच वाहनधारकांनी बसविल्या HSRP नंबर प्लेट!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असले तरी,याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात फक्त 27 टक्केच वाहनधारकांनी ह्या प्लेट्स बसविले असून,73 टक्के वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरटीओ कार्यालयातील नोंदणीवरून दिसून येत आहे. दरम्यान यंत्रणेने 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

राज्यात सर्वत्र 2019 पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे फार्मान सोडण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात 2019 पूर्वी 2 लाख 90 हजार 291 वाहनांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 39 हजार 234 वाहनधारकांनीच HSRP नंबर प्लेट बसवली आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त 27 टक्के वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली असून आणखी 73 टक्के वाहन हे अद्यापही एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यापासून वंचित आहेत. आरटीओ विभागाकडून 30 नोव्हेंबर पर्यंत या नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ दिली असून त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित वाहनधारकांनी आपल्या एच एस आर पी नंबर प्लेट लवकरात लवकर बसवून घ्याव्या असे आवाहन बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे स.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विवेक भंडारे यांनी केले आहे.

▪️एचएसआरपीचे महत्व काय?

हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन प्लेट्स ही अल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट असून या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेसरने कोरलेला 10 अंकी पीन असतो. यावर स्टीकर प्रमाणे दिसणारा होलोग्राम असून त्यावर वाहनांच्या सर्व तपशीलाची ऑनलाइन नोंद असते.रात्रीच्या वेळी नंबर प्लेट व्यवस्थित दिसावी, यासाठी रेट्रो-रिफ्लेक्टीव्ह फिल्म देखील या नंबर प्लेटवर असते. ही नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असून बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणाऱ्यांना ही प्लेट तयार करता येत नाही.तसेच, बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणे, फॅन्सी नंबर प्लेट तयार करणे, नंबर प्लेटवर खाडाखोड करणे यामुळे चोरीच्या वाहनांना शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एचएसआरपी या नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आलं आहे. आता या प्लेटमुळे वाहनाच्या रजिस्ट्रेशन डिटेल्ससोबत ही प्लेट लिंक असल्यानं वाहन चोरीला गेलं तर सहजरित्या ट्रेस करता येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!