बुलढाणा (हॅलो बुलढाणा)‘गौर से देखो’ इन ‘खाकीधारियोंको!’ या शीर्षकाखाली हॅलो बुलढाणाची बातमी काल प्रकाशित होताच, आज पहाटेच गुन्हे शाखेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद परिसर समोर व भीलवाडा येथील दारू अड्यांवर पोलिसांनी धाड टाकली. त्यांनी काय कारवाई केली हे सध्या तरी गुलदस्तात आहे.पण याची माहिती लवकरच घेण्यात येणार आहे. कर्तव्यावर दारू पिऊन जाणे योग्य आहे काय? असा प्रश्न ‘हॅलो बुलढाणाने’ मांडला होता. त्याचा परिणाम असा झाला की, पोलिसांनी दखल घेतली.
काल असे वृत्त प्रकाशित झाले होते की,
कायदा व सुव्यवस्था ठेवून शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड नेहमीच तत्परतेने कार्य करतात. त्यांचे कार्य पोलीस व समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, परंतु हे होमगार्ड सकाळीच मद्यप्राशन करून ड्युटीवर जात असतील तर? वरिष्ठ अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात? दारू पिऊन ड्युटीवर जाणे कितपत योग्य आहे?हा खरा सवाल विचारण्यात आला होता.यामध्ये काही पोलीसही सहभागी आहेत हे सत्य मांडण्यात आले. वृत्त व्हायरल होताच आज कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
या कारवाईमुळे दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.