बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कबाडकष्ट करून जगवलेले पीक शेतजमीनीसह अतिवृष्टीने हिरावून नेल्याने शेतात तळे तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील पाणी साचल्याचे दुःखद चित्र आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यातील 19 दिवसात तब्बल 456 गावे अतिवृष्टीने बाधीत होऊन नैसर्गिक आपत्तीने 89730.70 फक्त शुक्रवार पाणी फेरले आहे.परंतु त्यानंतरचे पंचनामे गाळात रुतले असून, नुकसान भरपाईची मागणी उठत आहे.
आसमानी व सुलतानी संकटांना सामोरे जाणारा शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे हताश झाल्याचे दिसून येत आहे.कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पीकविम्याची प्रतिक्षा, कधी बाजारभावाची अनिश्चितता अशा हे संकटांच्या साखळीत अडकलेले शेतकरी शेवटी गळ्या भोवती फास लावून आयुष्यच संपवत असल्याचे जळजळीत वास्तव आहे. गेल्या 6 महिन्यात जिल्ह्यातील 91 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बुलढाणा ओळखला जातो. नापिकी, कर्जाचा डोंगर, वांझोटी पिक विमा योजना,हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव आणि सरकारचे शेतकऱ्यांप्रति उदासीन धोरण या कारणामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. शेतकरी सातबारा कोरा होण्याची वाट पाहत असून,सत्ताधारी आश्वासन देत वेळ मारून नेतांना दिसतात.मात्र कर्जमाफी च्या काही हालचाली दिसून येत नाही. परिणामी शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे.दरम्यान एक ते 19 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीमुळेबुलढाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 456 गावे बाधित झाली असून, 89730.70 हेक्टरवरील सोयाबीन, तूर,मका,हळद, कापूस, उस, भाजीपाला आणि फळबाग उध्वस्त झाली आहे. त्यापैकी अति पावसामुळे 102 हेक्टर जमीन खरडून गेली आहे.दरम्यान 19 ऑगस्ट नंतरचे पंचनामे झाले नसून पीक नुकसानीचा आकडा आणखी फुगणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
▪️बाधित तालुक्यावर नजर
बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी अतिवृष्टीमुळे चिखली येथील 181,मेहकर येथील 161, देऊळगाव राजा येथील 64, संग्रामपूर येथील 24, सिंदखेडराजा येथील 22 तर मोताळा येथील 4 अशी 456 गावे बाधित झाली आहे.