बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगर पालिका प्रशासनाकडून श्री गणेश विसर्जनाची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घरगूती लहान गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले.मोठ्या गणेश मंडळांसाठी सागवन येथील नदीवरील पूलावर बॅरिकेटिंग, वॉच टॉवर आणि विद्युत व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या गणेश मंडळांनी या ठिकाणी गणेश विसर्जन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.
बुलढाणा शहरात गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावात व उत्साह पूर्ण सुरू आहे.गणेश विसर्जनासाठी काही दिवस शिल्लक असल्याने नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी व्यवस्था केली आहे.सागवन येथील नदीवरील पुलावर मोठ्या मंडळाच्या गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.टीबी हॉस्पिटल जवळील सरकारी तलाव आणि राणी बागेतील तलावाचे बांधकाम सुरू असल्याने आणि यामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने येथे गणेश विसर्जन करता येणार नाही. तसेच
मलकापूर रोडवरील तलावाजवळ बॅरिकेटिंग करून हा तलाव विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे. घरगुती व लहान गणेश विसर्जनासाठी विविध ठिकाण निश्चित करण्यात आले असून कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहे.टीबी हॉस्पिटल जवळील सरकारी तलाव समोर, गजानन महाराज चौकातील राधिका हॉटेल समोर,गणेश नगर पाटील जवळ, एकता नगर नाट्यगृहासमोर आणि राणी बागेत कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले.शहरातील कऱ्हाळे लेआउट जवळील कोणत्याही मंडळाला गणेश विसर्जन करता येणार नसल्याचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी सांगितले आहे. तसेच मलकापूर रोडवरील तलावाजवळ बॅरिकेटिंग करून हा तलाव विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे.