बुलढाणा (हॅलो बुलढाणा) यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबरच्या उंबरठ्यावरच झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे स्वर्गीय भोंडे जलाशय 100 टक्के भरल्याने परिसरातील 15 गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जलाशयाचे 5 गेट उघडण्यात आले आहे.
बुलढाणा चिखली राज्यमार्गावर असलेल्या येळगाव धरणावरून शहर व परिसरातील 15 गावांना नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरी भागात नगरपालिकेद्वारे काही भागात जुनी पाइपलाइन तर काही भागात थ्री व्हॉल्व्ह सिस्टीमद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी शहर परिसरातील येळगाव धरणातून जलशुद्धीकरण केंद्र व या केंद्रातून शहरातील जलकुंभात पाणी येते. या जलकुंभात शहर परिसरात चवथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गेल्या चार-पाच दिवसांपासून पैनगंगा नदीच्या ‘कॅचमेंट’ क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला आणि येळगाव धरणात पाणीसाठ्याची क्षमता 12.40 दलघमी असून, यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच धरण जवळपास 100 टक्के भरले आहे.