डोणगाव (हॅलो बुलडाणा) पावसाळ्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे.अशा काळात आरोग्य सेवा तत्पर असायला हवी मात्र डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आज सुट्टीमुळे बंद असल्याचे सांगितले जात आहे.वास्तविक पाहता आज जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केलेली नाही. आणि या रुग्णालयात डॉक्टर, नर्स यांची अनुपस्थिती आहे.त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.परंतु येथे समस्यांचा सुकाळ असून, रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप होतो आहे.आज दवाखाना का बंद आहे? असे विचारल्यावर आज १ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून सुट्टी आहे,असे भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले.वास्तविक पाहता आज कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्राला सुट्टी नाही. मात्र डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून परिसरातील रुग्णांना नाक त्रास सोसावा लागला आहे.दरम्यान या प्राथमिक आरोग्य केंद्रावरच उपचार करण्याची गरज आहे.