धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा) ऑगस्ट महिन्यात सण उत्सवाची रेलचेल असते.या उत्सवा दरम्यान पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन जनजागृती करून कायदा अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असतात.मात्र धामणगाव बढे येथे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यापैकी पथदिवे बंद असल्याने गावकरी हैराण झाले आहेत.
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे या गावात पथदिवे बसवण्याची ग्रामस्थांची तातडींची मागणी आहे. गणेशोत्सव आणि ईद मिलादुन नबी यासारखे सण तोंडावर असताना धामणगाव बढे गावातील पथदिवे गेल्या तीन ते चार महिन्यापासून बंद असल्याने ग्रामस्थ अंधारात आहेत. या समस्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असुन माजी सरपंच पती अलीम कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना या संदर्भात एक निवेदन दिले आहे. निवेदनात सणासुदीच्या काळात तात्काळ पथदिवे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सण आले तरी गावात अंधार आहे,यामुळे ये-जा करताना अडचणी येत असून गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवेदनात घंटागाडी नियमितपणे फिरवण्याची आणि बस स्थानकावरील सार्वजनिक स्वच्छालय, मुतारी घर तातडीने सुरू करण्याची मागणी ही करण्यात आली आहे. गावातील स्वच्छतेसाठी घंटागाडी आवश्यक असून बसस्थानकावरील शौचालय मुतरी सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्यांचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या गंभीर बाबीवर ग्रामपंचायत तत्काळ लक्ष घालून पथ दिवे घंटागाडी आणि शौचालय व मुतारी च्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देता वेळी माजी सरपंच पती अलीम कुरेशी व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गजानन भाऊ घोंगडे ग्रां.पं सदस्य, जमीर कुरेशी हाजर होते.