बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर भाजपाने आज आपली रणधुमाळी सुरू केली. भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिवालय येथील पक्ष कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाजपाच्या शिलेदारांनी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला.
“भाजपाचे कार्यकर्ते ही निवडणूक फक्त लढण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. नगरपालिकेतील सध्याचा गुंडाराज, दडपशाही आणि भ्रष्टाचार संपवून विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवणारा भाजपा नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आणायचे आहेत,” अशी आक्रमक गर्जना जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी केली.बैठकीत जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ माळी, जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल, अनंता शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे यांनी प्रभाग रचना व निवडणूक तयारीवर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. यावेळी विशेष निर्णय घेत विश्वनाथ माळी यांची बुलढाणा शहर भाजप प्रभारी म्हणून घोषणा करण्यात आली.
बैठकीस भाजपा ज्येष्ठ नेते विश्राम पवार, अण्णासाहेब पवार, माजी जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता शिंदे, अजित गुळवे, माजी नगरसेवक अरविंद होंडे, संजय अग्रवाल, सोनू बाहेकर, भाजयुमो शहराध्यक्ष कुणाल अग्रवाल, वैभव इंगळे, महिला नेते अल्काताई पाठक, उषाताई पवार, वर्षाताई पाथरकर, शोभाताई ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.