बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अलीकडे समृद्धी महामार्गावर अपघात एवढे वाढले की, यंत्रणेचे याकडे पूर्णता दुर्लक्ष दिसून येत आहे. 2 जुलै रोजी ट्रक व ट्रेलर मध्ये अपघात होऊन एकाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात चायनल नं.335.5 नागपुर कोरिडोर येथे 14.50 दरम्यान झाला.
हकीकत अशा प्रकारे आहे की, ट्रेलर क्र. MH 49 AT 3148 चा चालक पप्पू सोनी वय 40 राहणार मनसर हा समृद्धी महामार्गावर पाऊस सुरू असल्याने ट्रकचे वायफर दुरुस्त करण्यासाठी थांबला होता. दरम्यान पाठी मागून येणारा ट्रक क्रमांक CG 04 LF 5501 चा चालक सुकलाल करकट्टा वय 27 राहणार छत्तीसगड याने ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने तो स्वतः किरकोळ जखमी झाला असून समीर करकट्टा वय 24 राहणार छत्तीसगड हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच ट्रेलर क्रमांक MH49AT3148 चालक पप्पू सोनी वय 40 राहणार मनसर व नवनाथ माळवे वय 55 राहणार पटवारी हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. सदर जखमींना ॲम्बुलन्स द्वारे सामान्य रुग्णालय जालना येथे रवाना करण्यात आले आहे.