spot_img
spot_img

💥EXCLUSIVE मतदार यादीत घोळ! – निवडणूक आयोग गाफील? मृतांच्याही नावावर मतदान? – बुलढाणा मतदार यादीत धक्कादायक उघड! – जयश्री शेळके म्हणाल्या.. बुलढाणा मतदारसंघाची फेरमोजणी करा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मतदार यादीमध्ये घोळ झालाय. सरकारला नव्हे तर निवडणूक आयोगाला जाब विचारण्यात येणार असून दिल्लीत 300 खासदार रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी हायकोर्टात एका अर्जाद्वारे सादर केली आहे.

महाविकास आघाडीमधील उद्धवसेनेच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची फेरमोजणी
करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.या मतदारसंघामधून शिंदेसेनेचे उमेदवार संजय गायकवाड हे विजयी झाले आहेत. त्यांना ९१ हजार ६६०, तर शेळके यांना ९० हजार ८१९ मते मिळाली. शेळके केवळ ८४१ मतांनी पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांनी मतमोजणीवर
आक्षेप घेतला आहे. निवडणुकीत अनियमितता झाली. मतदार यादीमध्ये ३ हजार ५६१ बोगस मतदारांचा समावेश होता.अनेकांची नावे दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी होती. अनेक ठिकाणी मृत मतदारांच्या नावावर मतदान करण्यात आले. परिणामी, मतदारसंघात वापरलेल्या सर्व इव्हीएम न्यायालयात आणून न्यायालयाच्या अधिकाऱ्यांसमक्ष
फेरमोजणी करण्यात यावी, असे शेळके यांचे म्हणणे आहे.

▪️या कागदपत्रांची मागणीही केली!

बुलडाणा मतदारसंघाची मतदार यादी, सर्व बुथवरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाड यांचे निवडणूक विजयाचे प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही मागणी शेळके यांनी केली आहे. त्याकरिता त्यांनी
स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. शेळके यांच्यातर्फे अॅड. आकाश मून यांनी कामकाज पाहिले.

▪️गायकवाड यांच्या अर्जास विरोध

शेळके यांनी गायकवाड यांच्याविरूद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. गायकवाड यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ अंतर्गत अर्ज दाखल करून ही निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी न्यायालयाला केली आहे. शेळके यांनी या अर्जालादेखील प्रत्युत्तर दिले आहे. गायकवाड यांचा अर्ज गुणवत्ताहीन वनिराधार आहे. त्यामुळे हा अर्ज फेटाळून
निवडणूक याचिकेवर गुणवत्तेच्या
आधारावर निर्णय देण्यात यावा, अशी विनंती शेळके यांनी न्यायालयाला केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!