बुलडाणा (हॅलो बुलढाणा) बुलडाणा अर्बन संस्थेच्या कर्मचारी गणेश मंडळाचे यंदा २४ वे वर्ष आहे. यावर्षी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव धडक्यात साजरा होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेश मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बुलढाणेकरांना ‘चला हवा येऊ द्या!’ ची हास्य मेजवाणी उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक घरातील आवडता कार्यक्रम म्हणजे झी मराठीवर लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ हा असुन या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार 29 ऑगस्ट 2025 संस्थेचे सहकार विद्या मंदिराचे सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी 7 वाजता करण्यात आले असून या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण भारत गणेशपुरे, गौरव मोरे,कुशल बद्रिके, अंकुर वाढवे, आणि धनश्री दळवी यांच्यासह झी मराठी फेम कृष्णा मुसळे रसिका जोशी, राजकुमार निंबोकार, श्रध्दा वरणकार हे सर्व कलाकार सादरीकरण करणार आहेत.या भव्य कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर आणि बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेशजी झंवर आणि अनंताभाऊ देशपांडे यांच्या मार्गदर्शनात गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नेहमीच्या ताणतणावातुन काही क्षण मुक्ती मिळण्यासाठी सर्वांनी या कार्यक्रमास सहपरिवार उपस्थित रहावे, असे आवाहन गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले.