बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील डोणगावस्थित चार सुशिक्षित बेरोजगारांची एका श्रीराम चिटस फायनान्स कंपनीच्या एजंटने चेक व स्वाक्षरी घेऊन परस्पर बँक खात्यातील पैसे काढून घेऊन फसवणूक केली.संबंधितांना तक्रारी करून देखील दखल घेतल्या जात नसल्याने 28 ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास 2 सप्टेंबर पासून डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
श्रीराम चिटस फायनान्स कंपनीचा एजंट गजानन त्र्यंबक आखाडे व नारायण विश्वनाथ आनकर हे दोघे अवैध सावकारी व आयटीआर, रिटर्न्स आयकर विभागाचे खोटानाटा व्यवसाय करतात. त्यांनी चार सुशिक्षित बेरोजगारांकडून सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावावर त्यांचा विश्वास जिंकत त्यांच्याकडून दहा- दहा चेक घेतले. आणि बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेऊन, कंपनीचा खोटा आयटीआर, रिटर्न्स देऊन फसवणूक केल्याचा आरोप होतोय. महेश अर्बन डोणगाव बँकेतून बनावट सह्या करून 1 लाख 80 हजारांचा टू कॅशचा व्यवहार माझ्या माघारी केल्याचे तक्रारदार संदीप पळसकर यांचे म्हणणे आहे.या संदर्भात दहा संबंधित विभागांना रीतसर तक्रार देऊनही अद्याप तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याने
28 ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास 2 सप्टेंबर पासून डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा
मेहकर तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रतिलिपी संबंधितांना पाठविण्यात आल्या आहे.