बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कायदा व सुव्यवस्था ठेवून शांतता राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड नेहमीच तत्परतेने कार्य करतात. त्यांचे कार्य पोलीस व समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, परंतु हे होमगार्ड सकाळीच मद्यप्राशन करून ड्युटीवर जात असतील तर? वरिष्ठ अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात? दारू पिऊन ड्युटीवर जाणे कितपत योग्य आहे?हा खरा सवाल आहे. यामध्ये काही पोलीसही सहभागी आहेत.
‘हॅलो बुलढाणा’नेहमीच सत्याच्या पाठीशी आहे.
‘हॅलो बुलढाणा’ च्या निरीक्षणात एका दारूच्या अड्ड्यावर सकाळीच मध्य प्राशन करणारे होमगार्ड आढळून आले. खाकी पॅन्ट आणि जॉकेट घालून त्यांनी आपल्याला कोणी ओळखत नसल्याचे अविर्भावात मदिरा ढोसली. त्यानंतर हे होमगार्ड कर्तव्यावर निघून गेले. परंतु विशेष बाब म्हणजे काही होमगार्ड पोलीस असल्याचे भासवून अंगठा छाप लोकांना भुलथापा देत पैसे उकळतात. त्यांना पोलीस आहे म्हणून कारवाईची धमकी देतात. अशा होमगार्डांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज द्यावी,अशी मागणी केली जात आहे.