चिखली (हॅलो बुलढाणा) उप निबंधकांच्या टाटाखालील मांजर शिल्लक पैशांसाठी लाळ गळत असून, नागरिकांचे सरळ काम न करता खाबुगिरीसाठी भलतेच चटकल्याचे चित्र चिखली येथील दुय्यम निबंधक कार्यालयात
पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नसल्यामुळे वरिष्ठांनी या प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून होऊ लागली आहे.
जमीनधारकांना खरेदी विक्रीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयातून कामकाज पाहिले जाते,आणि सध्याच्या काळात जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, अशातच चिखली तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात दलालाशिवाय नागरिकांची कामे होत नसल्यामुळे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. मागच्या अनेक महिन्यापासून हा प्रकार सुरू असून याकडे वरिष्ठ प्रशासनाकडून साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. येथील दुय्यम निबंधक हा जमीन खरेदी विक्रीकरिता महत्त्वाचा विभाग आहे.याकार्यालयात अधिकृत शासकीय कर्मचारी नियुक्त असतांना नियुक्तीपेक्षा अधीक कर्मचारी कामासाठी दिसतात, ही कायद्याची पायमल्ली असल्याचा आरोप होत आहे. कोणत्याही कामासाठी जा पण आधि कर्मचाऱ्यांना भेटा असा येथे अलिखित नियम आहे. या कार्यालयतिल कार्यरत अधिकारी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी नवे अधिकारी रुजू झाले मात्र कामकाजाची पद्धत आता फारच बिकट झाल्याचा आरोप होत आहे.या ठिकाणी सर्वच कामे दलालांमार्फत होत असल्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जमीन खरेदी विक्रीसाठी नागरिकांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. अधिक मूल्यांकन दाखवून भाव केले जातात असल्याचा प्रकार बेफिकिरपणे सुरू असून याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
क्रमशः