spot_img
spot_img

बुलडाण्यातील सहकार क्षेत्राला मिळाली नवी ऊर्जा – शिवाजीराव तायडे जिल्हाध्यक्ष!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाण्याच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील आघाडीचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजीराव तायडे यांना मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन मुंबईच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव, निष्ठा आणि जनतेशी असलेले घट्ट नाते लक्षात घेऊन 24 ऑगस्ट रोजी कल्याण (मुंबई) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात झालेल्या भव्य कार्यक्रमात संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सहकाररत्न मधुकरराव बोडखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र बहाल करण्यात आले. या वेळी तानाजीराव कवडे, मधुकरराव गायकर, डॉ. संतोषराव गाढे, रुपेश बावनकर, नलिनीताई बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते.

तायडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील 13 तालुके व 13 शहरे यांना संघटनात्मक बळकटी मिळणार आहे. सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी समर्पित कार्य करणाऱ्या तायडे यांनी यापूर्वी महाराष्ट्र मराठा सोयरिक तर्फे ‘अंभोडा भूषण पुरस्कार’ प्राप्त केला असून, ते मा. जिजाऊ अर्बन परिवाराचे उपाध्यक्ष व सहकार भारतीचे बुलडाणा तालुकाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.समृद्धी फाउंडेशनचा उद्देश ग्रामीण-शहरी सहकार संस्थांचे पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, सहकार फॉर युथ व्याख्यानमाला द्वारे युवकांना सहकार चळवळीत आणणे, महिलांचे सक्षमीकरण, पर्यावरणपूरक उपक्रम, ‘माजी वसुंधरा अभियान’, ग्रामीण महिलांना बीज मोदक उत्पादनातून आर्थिक स्थैर्य देणे असे अनेक उपक्रम राबविण्याचा आहे.

नियुक्तीनंतर बोलताना तायडे म्हणाले की, “संस्थेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत सहकारातून समृद्धीकडे नेणारा मार्ग जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहीन. सहकार क्षेत्राला बुलडाण्यात नवी दिशा आणि नवचैतन्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.”

शिवाजीराव तायडे यांच्या निवडीबद्दल बुलडाणा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि सहकारी क्षेत्रातून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!