spot_img
spot_img

नगर परिषद बुलडाणा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गजेंद्र दांदडे – सर्वानुमते निवड, कर्मचाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) नगर परिषद बुलडाणा येथे आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या महत्वाच्या बैठकीत नगर परिषद कर्मचारी संघटनेची नवी कार्यकारिणी ठरली. या कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते श्री गजेंद्र शालीग्राम दांदडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीमुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बैठकीस नगर परिषदेतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री शंकर उमळकार, उपाध्यक्ष पौर्णिमा सुस्ते, सचिव रमीज राजा रफिक चौधरी, तसेच संजय मुळे, राजेश गायकवाड, गौतम आराख, राजू आराख, सतीश ताठे, सुनील काळे, गुलाबराव इंगळे आदींचा समावेश होता. सर्वांनी एकमुखाने गजेंद्र दांदडे यांना समर्थन देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.या निवडीच्या वेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करत नव्या अध्यक्षांचा गौरव केला. यापुढील काळात कर्मचारी वर्गाच्या प्रश्नांवर ठोस लढा देत संघटनेला बळकटी देण्याचा विश्वास गजेंद्र दांदडे यांनी व्यक्त केला. त्यामुळे नगर परिषद कर्मचारी संघटनेत नवचैतन्याची लाट उसळली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!