बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पुढाकारातून “फिट इंडिया” मोहीमे अंतर्गत बुलढाणा पोलिस दलाच्या वतीने आज सायकल थॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिक व पोलीस दलातील अधिकारी-
कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग लाभला. या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे “फिटनेस की डोस, आधा घंटा रोज” हा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे.
या स्पर्धेत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह पोलिस कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मुली, महिला तसेच सामान्य नागरिकांनी सुद्धा मोठा सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. नागरिकाचे आरोग्य अबाधित राहिले पाहिजे या उद्देशातून जनजागृती व्हावी यासाठी या स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.तर पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यात नशामुक्त बुलढाणा जिल्हा हा सुद्धा उपक्रम राबवल्या जात
आहे.