spot_img
spot_img

चिखली शहराच्या मध्यभागी ‘करंट बॉम्ब’ – MSEB च्या बेपर्वाईने तरुण गंभीर!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखलीच्या बाबुलॉज चौकात आज दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिक घाबरले. पुंडलिक नगर येथील यश राजू कोतवाल (वय २५) हा प्लंबर एका घरावर पाण्याची टाकी बसवत असताना वरून गेलेल्या MSEB च्या 11 केव्ही खुल्या तारांच्या संपर्कात आला. क्षणभरातच प्रचंड करंट बसल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहराच्या मध्यभागी अशा जीवघेण्या तारांचे उघडपणे झुलत राहणे म्हणजे रोजच नागरिकांच्या डोक्यावर ‘करंट बॉम्ब’ टांगल्यासारखे आहे. ही दुर्घटना MSEB च्या थेट निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचा नागरिकांचा संताप उसळला आहे. आता तरी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!