spot_img
spot_img

सोन्याच्या नकली गिण्या दाखवून १० लाख ४६ हजारांची लूट! – सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नकली सोने विक्रीचे आमिष दाखवून मजूर व कॉन्ट्रॅक्टरला बोलावून त्यांच्यावर हल्ला करून १० लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटल्याची घटना अमडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

असून, त्यापैकी चार आरोपींची ओळख पटली आहे.फिर्यादी राजेश महादेव नगराळे (वय ३८, रा. सास्ती, ता.राजुरा,जि. चंद्रपूर) हे मजुरीचे काम करतात. त्यांचे सहकारी गणेश मडावी यांच्यासोबत त्यांचा बांधकाम कंत्राटाच्या माध्यमातून अजय नावाच्या व्यक्तीशी संपर्क झाला होता.१३ ऑगस्ट रोजी अजयने फोन करून आपल्या शेतात सोन्याची नाणी सापडल्याचे सांगितले आणि ती विकण्याचा

प्रस्ताव ठेवला. १५ ऑगस्ट रोजी अजयने दोन नाणी दाखवली. त्यावर विश्वास ठेवून राजेश व गणेश यांनी १० लाख रुपयांची रोख रक्क
घेऊन व्यवहार करण्याचे ठरवले. १८ ऑगस्ट रोजी रात्री ते चंद्रपूरहून कारने (एम. एच. ३४
बीआर ७२२१) निघाले व १९ ऑगस्टच्या सकाळी जानेफळ परिसरात पोहोचले. इसोली रस्त्यावर अजयने त्यांना नकली सोने
दाखवले. व्यवहारात संशय आल्याने दोघे माघारी फिरत असताना अचानक ५ ते ७ अज्ञात व्यक्तींनी तलवारी, कोयते, चाकू घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात
गणेश मडावी गंभीर जखमी झाले. आरोप १० लाख रुपये रोख, मोबाइल फोन, कारची
चावी, घड्याळ व रोख रक्कम असा एकूण १०.४६ लाख रुपयांचा ऐवज लुटून पलायन केले. अशी फिर्याद नगराळे यांनी अमडापूर
पोलिस ठाण्यात दिली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!