संग्राममपूर (हॅलो बुलढाणा) ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून जन्मदात्या वडिलांची मुलाने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना 19 ऑगस्ट रोजी संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे
उघडकीस आली आहे. शिवाजी रामराव तेल्हारकर असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सुनेने तक्रार दिल्यावर पोलीसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून,आरोपीला न्यायालयाने 25 ऑगस्ट पर्यंत पीसीआर सुनावला आहे.
‘तू घर काम करीत नाही,घराकडे लक्ष देत नाही’ अशी विचारणा वडिलांनी मुलाला केली त्यानंतर ताटात उष्टे अन्न ठेवल्यावरून रामराव तेल्हारकर यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शिवाजी तेल्हारकर याने वाद घातला.या वादात शिवाजीने कुऱ्हाडीचे वार करून वडिलांना गंभीर जखमी केले आणि त्यांचा यातच मृत्यू झाला.दरम्यान पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने शिवाजी तेल्हारकर याने वडिलांचा मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात टाकून पूर्ण नदीच्या पुरात फेकून दिला.ही घटना 19 ऑगस्ट रोजी समोर आल्याने याप्रकरणी आरोपीच्या पत्नीनेच पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गून्हा दाखल करण्यात आला आहे.अद्यापपर्यंत प्रेत आढळून आले नाही.आरोपी मुलगा शिवाजी याला संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता 25 ऑगस्टपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.