मोताळा (हॅलो बुलढाणा) केंद्र सरकारने ट्रॅक्टर धारकांना ब्लॅक बॉक्स व जीपीएस बसविणे अनिवार्य करण्याचा घेतलेला शेतकरीविरोधी निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी मोताळा तालुका काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्च्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या या मोर्च्याचे नेतृत्व केले. मारुती संकुलातून निघालेला मोर्चा घोषणाबाजीच्या गजरात तहसील कार्यालयापर्यंत गेला. शेकडो ट्रॅक्टर व हजारो शेतकरी, महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकरी एकता जिंदाबाद, कृषीविरोधी सरकार हाय हाय, ब्लॅक बॉक्स जीपीएस निर्णय रद्द करा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला .
मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सरकारने हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा तालुका काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रवीण कदम, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण खराटे, किसान कमिटी तालुका अध्यक्ष नीतीराजसिंह राजपूत, मोताळा शहराध्यक्ष निना इंगळे, अभिजीत खाकरे, गजानन मामलकर, संजय किनगे, मिलिंद जयस्वाल, तुळशीराम नाईक, प्रकाश बशी, विकास उजाडे, कैलास गडाख, दिलीप मोरे, भास्कर आघाम, कैलास पाटील, शेख शोहेब, शेख असगर, शेख वसीम चुनेवाले, अमोल शि. देशमुख, मोहसीन खान, भारत मापारी, भागवत किंगे, विनोद वानखेडे, इरफान पठाण, अबीत कुरेशी, रफीक भाई यांच्यासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, किसान काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.