बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अतिवृष्टीने जिल्ह्यातील मोठे जलप्रकल्प खळखळून वाहत आहेत. खडकपूर्णात 93 टक्के जलसाठा असून आज 11 वक्रद्वार उघडले आहे. पेनटाकळी प्रकल्पात 88 टक्के जलसाठा असून 9 गेट उघडल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पापैकी खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पक्षेत्रात कोसळधार पाऊस झाल्याने आज देऊळगाव राजा हद्दीतील खडकपूर्णा प्रकल्प 93 टक्के भरला असून या प्रकल्पाचे 11 वक्र द्वार 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून 26559 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पात 88 टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून या प्रकल्पाचे आज सकाळी 9 वक्र दरवाजे 30 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून 6482 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पूर नियंत्रण कक्षाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.