बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पशुधन चोरणाऱ्या अंतर जिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला गजाआड केले आहे. गुन्हेगारांनी 10 गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी इनोव्हा कारसह मोबाईल असा एकुण 5 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,आपण पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालीस्थागुशाचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वातील पथकाने विशेष नाकाबंदी करून ही कारवाई केली.आरोपी शेख रशीद शेख शफी वय 45 रा. धूळे,शेख नदीम शेख जाबीर वय 24 रा.सिल्लोड, सय्यद मोईन सय्यद अजीम वय 25 रा.सिल्लोड,मोहम्मद कुरबान मोहम्मद अजीज वय 35 रा.धूळे, शेख समीर शेख खलील वय 28 रा. सिल्लोड या टोळीला जेरबंद केले आहे. चिखली येथील गोपाल साखरकर यांनी गोठ्यातील गाय चोरी गेल्याची फिर्याद दिली होती.दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले असता त्यांना जनावरे चोरणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली.जाफ्राबद रोडवर नाकाबंदी करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.पोलिसी खाक्या दाखविला असता, गुन्हेगारांनी 10 गुन्ह्यांची कबुली दिली असून आरोपींकडून इनोव्हा कारसह मोबाईल असा एकुण 5 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.