बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आरोपीने 27 जून रोजी सोशल मीडियावर आठ लाख फोलोअर्स असलेल्या जिल्ह्यातील एका महिलेचे फेक फेसबुक अकाउंट तयार करून महापुरुषांबद्दल बदनामीकारक व आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आरोपी निलेश सुनील सोनार वय 26 रा.भुसावळ जि. जळगाव विरोधात सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सदर आरोपीने जिल्ह्यातील रीलस्टार महिलेचे फेक फेसबुक अकाउंट तयार करून त्यावरून महापुरुषाबद्दल बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली.धार्मिक भावना दुखावल्यामुळे नेटकऱ्यांनी सदर रिल स्टार महिलेविरुद्ध टिकेची झोड उठवली होती.
दरम्यान रील स्टार महिलेने बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तपासचक्र फिरवून
धार्मिक भावना भडकावणाऱ्या निलेश सुनील सोनार वय 26 रा.भुसावळ जि. जळगाव या आरोपीवर कलम 299 बीएनएस आर/डब्ल्यू 66 (सी) आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखालीसायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगिर यांनी केली आहे.