बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात सर्व दूर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मेहकर, लोणार,सिंदखेड राजा तालुक्यातील नाल्यातील पाणी जानेफळ नजीकच्या खातोडी पुलावर आल्याने सकाळपासून खामगाव- मेहकर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.तर मेहकर तालुक्यातील डोणगाव जवळ असलेल्या कास नदीला पूर आल्याने पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह असल्यामुळे नागपूर ते मुंबई हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय.
आता दोन-तीन दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील 12 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.पावसाने काही ठिकाणी धुमाकूळ घातला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.पावसाचे पाणी अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने घरगुती साहित्याची नासधूस व अशंता घरांची पडझड झाली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीकच्या कास नदीला पूर आल्याने पूलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे.त्यामुळे सकाळपासूनच नागपूर ते मुंबई महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय.तसेच मेहकर,लोणार, सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे जानेफळ जवळ असलेल्या खातोडी पूलावरून पाणी वाहत असल्यामुळे खामगाव ते मेहकर महामार्गावर वाहतुक खोळंबोली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.