spot_img
spot_img

चिखलीजवळ भीषण अपघात – होंडा वेन्यूची एपेला धडक, तीन जण जखमी!

चिखली (हॅलो बुलडाणा/सय्यद साहिल) दि.१७ ऑगस्ट अमडापूर-चिखली रस्त्यावर आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. अमडापूरहून चिखलीकडे येणारी होंडा वेन्यू चारचाकी (क्रमांक एमएच २८ बीक्यू ७४२५) रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एपे (क्रमांक एमएच २८ आर ८७६) वर प्रचंड वेगात आदळली. धडक इतकी जोरदार होती की वेन्यू गाडी जवळपास ५० मीटर पुढे खेचली गेली आणि रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या थरारक अपघातात होंडा वेन्यूतील चालकासह एक प्रवासी आणि एपेतील एक व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र अपघाताच्या भीषणतेकडे पाहता तिघेही थोडक्यात बचावले हे मोठे भाग्यच म्हणावे लागेल. जखमींना तातडीने चिखली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

अपघातानंतरची दृश्ये अक्षरशः हादरवून टाकणारी होती. वेन्यू गाडीची समोरील बाजू पूर्णतः चकनाचूर झाली असून एपेही लोखंडी कचऱ्यात बदलली आहे. घटनास्थळी काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिकांनी तत्परतेने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलविले.या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेगमर्यादा ओलांडणे आणि चालकाचे लक्ष विचलित होणे हे प्रमुख कारण असावे, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!