spot_img
spot_img

खडकपूर्णा तुडूंब! – प्रकल्पात 88 टक्के जलसाठ्यामुळे 9 गेट उघडले! – नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) पूर्णा नदीवर बांधलेला खडकपूर्णा प्रकल्प जिल्ह्यातील देऊळगाव राजा-चिखली मार्गावरील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प आहे.सध्या तीन- चार दिवसापासून प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हा प्रकल्प 88 टक्के भरला असून, प्रकल्पाचे 9 वक्रद्वार 30 सेंमीने उघडल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.

जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने 520.50 संचय पातळी असलेल्या खडकपूर्णा या माेठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचा संकल्पित साठा 93.4040 दलघमी ऐवढा आहे.आज स्थितीत 550.110 मी.इतकी पाणी पातळी असून, उपयुक्त साठा 82.075 दलघमी आहे. एकुण 87.87 टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने या प्रकल्पाचे
9 दरवाजे 30 सेंमीने उघडण्यात आले आहेत तसेच इतर प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात काही दिवसांपासून चांगला पाऊस हाेत आहे. प्रकल्पांच्या क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने मध्यम व माेठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा 87.87 टक्क्यांवर पाेहचल्याने 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 30 सेंमीने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीकडच्या 33 गावांना पूर नियंत्रण कक्षाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!