लोणार (हॅलो बुलढाणा/संदीप मापारी) लोणार शहरात एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या घराला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
बंडू नारायण अंभोरे वय 55 वर्ष हे आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना, अचानक घरात इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट मुळे आग लागून आगीचा धूर घराच्या बाहेर खिडकी दरवाजातून येताना शेजारील लोकांनी पाहून बंडू अंभोरे यांना फोन करून कळविले असता ते त्वरित घरी धाव घेऊन आले व बघतात तर काय घरात आगीचा तांडव दिसून आला. घरातील कपडे, व्यवहारातील सर्व सामान कुलर, फ्रिज,टीव्ही,
मिक्सर तसेच अनेक उपयोगी अन्नधान्य अनमोल साहित्य जळून खाक झालेले दिसुन दिसून आले. मुलांचे शैक्षणिक साहित्य दप्तर ड्रेस पुस्तके वह्या लेटर हे सर्व जळून खाक झाले. यामध्ये घरातील महत्त्वाची कागदपत्रे तसेच घरात असलेली चांदीचे दागिने रोख रक्कम दीड लाख रुपये जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेत एकूण अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक तलाठी व मंडळाधिकारी यांनी स्थळ निरीक्षण करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर केलेला आहे. करिता शासनाने बंडू अंभोरे यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा भाजपा तालुका उपाध्यक्ष सुरेश तातेराव आंभोरे यांनी व्यक्त केलेली आहे.