बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसर आणि शिंदी गावांमध्ये आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भाची माहिती मिळताच केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिंदी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे आणि सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनावर दिले.
आज 16 ऑगस्ट रोजी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे बुलढाणा लोकसभा मतदार संघातील सिंदखेडराजा तालुक्याच्या दौऱ्यावर असतानाच या तालुक्यातील साखरखेर्डा परिसर आणि सिंदी गावांमध्ये दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील जमिनी खरडून गेल्यात. शेतकऱ्यांचे पीकही वाहून गेले. शिंदी गावातील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भाची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना मिळताच त्यांनी साखरखेर्डा परिसरात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या नुकसग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान व या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.