रायपूर (हॅलो बुलडाणा) स्व. मंजुळाई कोरडे पाटील ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था रायपूर संचलित श्री शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा भव्य जल्लोष साजरा झाला. आज, 15 ऑगस्ट 2025 रोजी, संस्थेच्या अध्यक्षा सौ. मीनाताई कोरडे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री देशमाने सर यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री एकनाथरावजी कोरडे पाटील उपस्थित होते.
मंचावर सौ. रेखाताई लोखंडे, श्री सुर्याजी सिरसाट, श्री रामराव सिरसाट, शे. बादल, सचिन जयस्वाल, आकाश फोलाने, राजु चव्हाण, रामसिंग कानडजे (संचालक) व शुभम कोरडे (संचालक) यांची मान्यवर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंजली चिकटे व कु. प्रांजल सिरसाट यांनी दमदारपणे केले.वर्ग 5 ते 10 मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, प्रभावी भाषणे व स्फूर्तिदायक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सकाळच्या प्रभात फेरीतील शाळेच्या लेझीम पथकाने उत्सवात विशेष रंग भरला.संस्थेचे सचिव श्री एकनाथरावजी कोरडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून देशसेवेची शपथ घ्यायला भाग पाडले व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक श्री जी.एन. जाधव सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन एस.पी. नप्ते सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हि.व्हि. सपकाळ सर, टि.डी. आकाळ सर, पी.बी. जाधव सर, ईश्वर मुरडकर व दिलीप कुंजरगे यांचे मोलाचे योगदान राहिले. देशभक्तीच्या जयघोषाने आणि तिरंग्याच्या साक्षीने संपन्न झालेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.