बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निसर्गात सातत्याने बदल होत आहे. कुठे पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण दिसत असताना, अशात हिरवा शालू नेसलेल्या बुलढाण्याने आज पहाटे धुक्याची चादर ओढून घेतल्याने हे दृश्य निसर्गप्रेमींनी डोळ्यात स्थिरावून ठेवले होते.सकाळी नऊ वाजेपर्यंत ही हिल स्टेशन बुलढाण्याची अनुभूती अनेकांनी घेतली.
बुलढाणा जिल्ह्यात पावसाने 2 -3 दिवसाआधी थैमान घातले. अद्याप देखील ढग मांडव घालून आहे. त्यामुळे वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. शिवाय शेतकरी चिंतेत आहेत. आज जिल्ह्यात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळे पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.आज सकाळी जिल्ह्यात सर्वत्र दाट धूक्याची चादर बघायला मिळत आहे. दरम्यान निसर्गप्रेमींनी या दाट धुक्याची मनसोक्त अनुभूती घेतली आहे.